शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोविड केअर’मध्ये सुविधा देण्याची जबाबदारी मनपाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:05 IST

मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब उजेडात आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या पातळीवर दैनंदिन स्वच्छता, विद्युत तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला : शहरात आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्ण तसेच संशयित रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात व्यवस्था केली. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब उजेडात आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या पातळीवर दैनंदिन स्वच्छता, विद्युत तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना मुक्कामी ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटरचे गठन करण्यात आले. संशयित रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना घरी न ठेवता पीडीकेव्ही परिसरात क्वारंटीन करण्याच्या प्रस्तावाला २७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली. त्याअनुषंगाने २६ मे रोजी रात्री मनपाच्या भरतीया रुग्णालयातील नमुने घेण्याचे केंद्र बंद करीत ते पीडीकेव्ही परिसरात हलविण्यात आले. या ठिकाणी २८ मेपासून संशयित रुग्णांचे नमुने घेण्यास सुरुवात केली जाणार होती. प्रत्यक्षात ही व्यवस्था सुरू न झाल्यामुळे २८ मे रोजी अकोट फैल व तारफैल भागातील रुग्णांना दिवसभर ताटकळत ठेवल्यानंतर सायंकाळी घरी परत जावे लागले होते. हा प्रकार कमी म्हणून की काय २९ मे रोजी रात्री दक्षिण झोनमधील अठरा संशयित रुग्णांच्या मुक्कामाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे संबंधित संशयित रुग्णांनी घरी परत जाणे पसंत केले होते.या प्रकाराची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कृषी विद्यापीठातील सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सुविधा राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे सोपविण्यात आली.स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाईकृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासाठी मनपाच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित इमारतीमधील स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई केली जाणार असून, मनपाच्या विद्युत यंत्रणेच्या वतीने इमारतीमधील नादुरुस्त पंखे, लाइट आदी साहित्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

इमारतीमधील प्रत्येक खोलीत तसेच स्वच्छतागृहांमध्ये दैनंदिन साफसफाई राखणे, विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच पाणीपुरवठ्याच्या संदर्भात यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले आहेत.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका