शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महानगरपालिकेला नालेसफाईचा मुहूर्त सापडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:25 IST

यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : उशिरा का होईना अखेर मान्सून दाखल झाल्यानंतर शहरात मनपाच्या स्तरावर सोमवारपासून नालेसफाईला प्रारंभ करण्यात आला. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी मोठे नाले तसेच एक मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या नाल्याची मान्सूनपूर्व साफसफाई केली जाते. त्यापूर्वी नालेसफाईच्या निविदा काढल्या असता कंत्राटदारांकडून थातूरमातूर पद्धतीने कामे केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. नालेसफाईच्या कामावर लाखो रुपयांची देयके अदा केल्यानंतरही समस्या कायम राहत असल्याची परिस्थिती होती. या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने मनपाच्या स्तरावर नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावर्षी जीवघेण्या कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोनाने तब्बल १ हजारचा आकडा गाठला आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे असले तरीही पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. शहरात मान्सूनचे आगमन झाल्यावर उशिरा का असेना सोमवारपासून मनपाच्यास्तरावर नाला सफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका