शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा कारभार रसातळाला; नगरसेवकांसाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:31 IST

महापौर व आयुक्तांनी उद्या शनिवार व रविवारी झोननिहाय नगरसेवक, झोन अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे.

- आशिष गावंडेअकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांचे प्रशासकीय कारभारावर नियंत्रण नसल्यामुळे मनपाचा कारभार रसातळाला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापौर विजय अग्रवाल व आयुक्तांमध्ये वारंवार प्रदीर्घ बैठका होत असल्या तरी त्यातून नगरसेवकांना भेडसावणाºया मूलभूत समस्यांवर तोडगा काढल्या जात नसल्याचे चित्र आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आयुक्तांप्रती तीव्र नाराजीचा सूर निर्माण झाल्याचे लक्षात येताच ही नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नातून महापौर व आयुक्तांनी उद्या शनिवार व रविवारी झोननिहाय नगरसेवक, झोन अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. भाजप लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून शहरातील रस्ते, पथदिवे आदी विकास कामे निकाली काढल्या जात असली, तरी त्यामध्ये मनपा प्रशासनाचे योगदान काय, असा सवाल उपस्थित होत आहे. मनपातील भ्रष्ट कारभाराची जाणीव असल्यामुळे की काय, भाजप लोकप्रतिनिधींनी रस्त्यांची सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे, विद्युत खांब, रोहित्र हटविण्याची जबाबदारी मनपाची असली तरी प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे सदर कामे ‘जैसे थे’ राहून रस्ता निर्मितीच्या कामाला खोळंबा होताना दिसत आहे. विकास कामे तर सोडाच, प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग, नादुरुस्त पथदिवे, रस्त्यांवर साचलेल्या सांडपाण्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी ‘एसी’ दालनाबाहेर निघण्यास तयार नसल्याची केविलवाणी परिस्थिती भाजपच्या कालावधीत पाहावयास मिळत आहे. आयुक्त संजय कापडणीस यांचे प्रशासनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अक्षरश: चतुर्थ श्रेणी कर्मचारीसुद्धा वरिष्ठांना जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे.समस्या ‘जैसे थे’, मग चर्चा कशाची?मनपाचा प्रशासकीय कारभार पूर्णत: ढेपाळला असून, प्रभागातील समस्या निकाली निघत नसल्याची परिस्थिती आहे. नगरसेवकांसह सर्वसामान्य नागरिक मनपाच्या नावाने बोटं मोडत असताना महापौर विजय अग्रवाल व आयुक्त कापडणीस यांच्यात कोणत्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा होतात, असा सवाल सुज्ञ अकोलेकर उपस्थित करीत आहेत.नगरसेवकांना गोंजारण्यासाठी बैठकस्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आयुक्त संजय कापडणीस यांच्याप्रती वाढत चाललेली नाराजी पाहून महापौर अग्रवाल व आयुक्तांनी समस्यांच्या निराकरणासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे बोलल्या जात आहे. आगामी दिवसांत प्रशासन किती सजग होते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

प्रभागात समस्यांचा ढीग; नगरसेवक वैतागले!प्रभागातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाप्रती नगरसेवकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, बांधकाम विभाग व नगररचना विभागातील अभियंता, मोटर वाहन विभागातील कर्मचारी समस्यांचे निराकरण न करता टाळाटाळ करीत असल्याचा नगरसेवकांचा अनुभव आहे.आयुक्तांकडे नगरसेवक फिरकेनात!आयुक्त संजय कापडणीस यांना प्रभागातील समस्यांबाबत वारंवार सूचना केल्यानंतरही समस्या निकाली निघत नसल्याचा नगरसेवकांना अनुभव येत आहे. आयुक्तांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्यावरही आयुक्तांच्या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे आयुक्तांच्या दालनाकडे नगरसेवक फिरकत नसल्याचे बोलल्या जात आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका