शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचे आंदोलन ‘टाय-टाय फिस्स’

By admin | Updated: July 20, 2016 01:33 IST

मनपा आयुक्त कार्यालयात कचरा फेकू न आंदोलन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने उधळून लावला.

अकोला: प्रभागातील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेविका राजेश्‍वरी शर्मा यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यालयात कचरा फेकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न प्रशासनाने उधळून लावला. कंत्राटदारांच्या खाबुगिरीला वेसण घालण्यासाठी यंदा प्रथमच महापालिका प्रशासनाच्या स्तरावर मॉन्सूनपूर्व नाले सफाई करण्यात आली. ही जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली. प्रभागातील नाल्यांची साफसफाई पूर्णत: केली नसून नाल्यांच्या काठावर माती व घाणीचे ढीग तसेच पडून असण्यावर नगरसेविका राजेश्‍वरी शर्मा यांनी आक्षेप घेतला. प्रशासकीय अधिकारी समस्या जाणून घेत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेविका शर्मा यांनी हातात कचर्‍याची बादली घेऊन मंगळवारी मनपात प्रवेश केला. मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकण्यासाठी नगरसेविका शर्मा जात असतानाच आयुक्त लहाने यांनी दालनाबाहेर येऊन त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच हा कचरा मनपात कोठेही न फेकण्याची सूचना केली. तसेच उपायुक्त समाधान सोळंके यांना प्रभागात जाऊन नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नगरसेविका शर्मा यांना कचरा फेकण्याची संधीच मिळाली नाही.