शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ९ पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 18:42 IST

पातूर येथील आणखी एक महिला व मुर्तीजापूर तालुक्यातील एक पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७ झाली.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने पातूर येथील आणखी एक महिला व मुर्तीजापूर तालुक्यातील एक पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७ झाली. तसेच आणखी ९ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९१० झाली आहे. दरम्यान दिवसभरात ४५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात २६७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ५ जणांमध्ये सर्वजण पुरुष आहेत. हे रुग्ण अकोट, अकोला शहरातील गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर आणि अकोट तालुक्यातील करोडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. यात कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व सिरसो मुर्तिजापुर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.दोघांचा मृत्यूपातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि. ५ जुलै रोजी दाखल झाली होती. दुपारनंतर मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मुर्तिजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.४५ जणांना डिस्चार्जमंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, कोविड केअर सेंटर मधून ३६, हॉटेल रिजेन्सी येथून तीन व ओझोन हॉस्पिटल मधून एक अशा ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२२० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १९१० (१८८९+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९७ जण (एक आत्महत्या व ९४कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५९३ आहे. तर सद्यस्थितीत २२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या