शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

CoronaVirus : अकोल्यात आणखी तिघांचा मृत्यू; ५४ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ७० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 13:02 IST

बुधवार, २४ जून रोजी आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्दे५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मृतकांचा आकडा ७० वर गेला आहे. एकूण बाधितांची संख्या १२९८ झाली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २४ जून रोजी आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतकांचा आकडा ७० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १२९८ झाली आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी २२५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ५४ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तीन जण दगावलेदरम्यान, मंगळवारी रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून, त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून, ते ९ जून रोजी दाखल झाले होते. कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला २१ जून रोजी दाखल झाली होती. या तिघांचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.आणखी सहा जणांना डिस्चार्जबुधवारी आणखी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले. तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ८३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३९६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल-२२५पॉझिटीव्ह अहवाल-५४निगेटीव्ह-१७१

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२९८मयत-७० (६९+१)डिस्चार्ज- ८३२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३९६

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला