शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिवसभरात तिघांचा मृत्यू; ३२ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५६ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:31 IST

मंगळवार, १६ जून रोजी या संसर्गजन्य आजारामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देआणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.कोरोनाच्या बळींचा आकडा ५६ वर गेला आहे. सद्यस्थितीत ३४१ जणांवर उपचार सुरु.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, १६ जून रोजी या संसर्गजन्य आजारामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. तर आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ५६ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०७३ झाली आहे. दरम्यान, आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३४१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढतच आहे. सोमवारी रात्री अकोट फैल भागातील एका ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदर महिलेला १३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळापूर येथील ७४ वर्षीय व्यक्तीला १३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.बार्शीटाकळी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते.आणखी ३२ अहवाल पॉझिटिव्हमंगळवारी सायंकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये ११ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील सात जण चावरे प्लॉट येथील, पाच जण बाळापूर येथील, दोन जण गुलजारपुरा, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण वाशीम बायपास, दोन जण मोठी उमरी, दोन जण तारफैल येथील, तर उर्वरीत शंकरनगर, अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर, चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.१८ जणांना डिस्चार्जमंगळवारी दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना कोविड केअर सेंटर येथे तर उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. ह्या रुग्णांपैकी खदान येथील तीन, तारफैल येथील दोन, खडकी येथील दोन, तर सिंधी कॅम्प, मोहता मिल, मोठी उमरी, बाळापूर, देशमुख फैल, गोरक्षण रोड, दीपक चौक, ध्रुव अपार्टमेंट,जीएमसी होस्टेल, सिटी कोतवाली, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.प्राप्त अहवाल-१३८पॉझिटीव्ह-३२निगेटीव्ह-१०६आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०७३मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-६७६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३४१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला