शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : फिलिपिन्समध्ये अडकले अकोल्यातील दहा विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:12 IST

मनिला या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना भारत परतही येता येत नाही व यापैकी काही विद्यार्थ्यांचा ‘व्हिसा’ संपला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जगातील अनेक देशांमधून भारतात येणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका अकोल्यातील दहा विद्यार्थ्यांनाही बसला आहे. फिलिपीन्समधील मेट्रो मनिला या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना भारत परतही येता येत नाही व यापैकी काही विद्यार्थ्यांचा ‘व्हिसा’ संपला आहे. कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे व्हिसाचे नूतनीकरणही होणे अशक्य असल्याने हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत.फिलिपीन्समधील मेट्रो मनिला या शहरातील आमा मेडिकल कॉलेजमध्ये अकोल्यातील दहा, बुलडाण्यातील दोन यांचा समावेश असलेले एकूण १७ विद्यार्थी महाराष्टÑातील आहेत. फिलिपीन्समध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या नियंत्रित होती; मात्र नंतर कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अकोल्यातील विद्यार्थी असलेल्या मेट्रो मनिला शहरातच १८७ रुग्ण असल्याने संपूर्ण शहर बंद करण्यात आले आहे, अशी माहिती या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या विद्यार्थ्यांनी भारतात परतण्याची तयारी सुरू केली होती; मात्र भारत सरकारने १७ मार्च रोजीच अफगाणिस्तान, फिलिपाइन्स, मलेशिया या देशांतून येणारी हवाई वाहतूक थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.कोरोना व्हायरसमुळे फिलिपीन्समध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. फुड मॉलसह खाद्यपदार्थांची दुकाने व हॉटेल गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी खानावळी सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी मनिलामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडणेही कठीण झाले आहे.

‘व्हिसा’चे नूतनीकरण अडकले!फिलिपिन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांचा ‘व्हिसा’ संपला आहे. त्यांना व्हिसा नूतनीकरणासाठी तेथील सरकारने नोटीस दिली आहे; ही बाब ‘लोकमत’कडे अनेक विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे मांडली. विद्यार्थ्यांची ही स्थिती ‘लोकमत’ने ना. संजय धोत्रे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्परतेने दखल घेतली.

फिलिपिन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत भारतीय दूतावासाशी संवाद सुरू आहे. परराष्टÑ मंत्रालय तसेच दूतावास याबाबत फॅलोअप घेत आहे मी त्यांच्या संपर्कात आहे.- ना. संजय धोत्रे, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी