शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:24 IST

यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा सूर गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत उमटला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात प्रशासनातील संबंधित यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा सूर गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत उमटला.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या कामात प्रशासनातील आरोग्य विभाग, महानगरपालिका, पोलीस विभाग इत्यादी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने शहरातील परिस्थिती बिघडली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या सूचनाही या बैठकीत लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ शर्मा, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, नगरसेवक तुषार भिरड, मनसेचे पंकज साबळे, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या सूचना प्रशासनाकडून ऐकल्या जात नाहीत. अकोला शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, प्रशासनामार्फत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.-गोवर्धन शर्मा, आमदार.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच प्रशासनातील संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम केले पाहिजे.-नितीन देशमुख, आमदार.

रुग्णालयात रुग्णांची सोय चांगली होते, असा संदेश लोकांमध्ये गेल्यास, नागरिक स्वत:हून तपासणीसाठी पुढे येतील. तसेच अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राज्य राखीव दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला पाहिजे.-रणधीर सावरकर,आमदार.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात पंधरा दिवस कडकडीत ‘लॉकडाउन’ पाळला पाहिजे. शहराच्या सीमा बंद करून, कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशसनातील संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. तसेच नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे.-अमोल मिटकरी, आमदार.

अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्याची गरज आहे.-डॉ. रणजित पाटील,आमदार.

मृत्यूदरात वाढ होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, अकोल्यात ‘लॉकडाउन’ आहे, असे वाटतच नाही. त्यामुळे संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिक घरातच कसे राहतील, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.-गोपीकिशन बाजोरिया, आमदार.जल्ह्यात येणाºया व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत नाही. गावा-गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास नियंत्रणात येणार नाही; यासंदर्भात प्रशासनाकडून उपाययोजना होत नाहीत. संसर्ग रोखण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.-प्रतिभा भोजने,अध्यक्ष, जिल्हा परिषद.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी आरोग्य तपासणी पूर्ण करण्याची गरज असून, पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या मागविण्यात आल्या पाहिजे.-विजय अग्रवाल, माजी महापौर तथा नगरसेवक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोणतीही व्यवस्था नाही.शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या नाही, तर भयानक संकटाचा सामना करावा लागणार आहे.-बबनराव चौधरी, माजी आमदार तथा महानगराध्यक्ष, काँग्रेस.संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या