शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू; २९ पॉझिटिव्ह, ६० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:12 IST

जिल्ह्यातील मृतांचा आकडा १०० झाला असून, एकूण रुग्णसंख्या २३८३ वर गेली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच आहे. शनिवार, २५ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर दिवसभरात २९ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १०० झाला असून, एकूण रुग्णसंख्या २३८३ वर गेली आहे. दरम्यान, ६० जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ११ महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या अकोट शहरातील तब्बल १२ जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोल्यातील शास्त्री नगर भागातील दोन, रामनगर भागातील दोन, केशव नगर भागातील दोन जणांसह बाभूळगाव ता. बार्शीटाकळी, जेल क्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पारस व मुर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील प्रत्येकी दोन जण, तर अकोल्यातील मलकापूर भागातील एक अशा पाच जणांचा समावेश आहे.७० वर्षीय वृद्धाचा मृत्यूशनिवारी एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगानगर, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष असून, त्यांना ११जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.६० जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ४६ जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण तर आयकॉन हॉस्पीटल मधून दोन जणांना अशा एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३१७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३७८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १९६६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३१७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या