शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू ; ३० पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११३६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:46 IST

शुक्रवार, १९ जून रोजी आणखी ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्दे ८२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली.एकूण बाधितांची संख्याही ११३६  झाली आहे.आज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अकोला: अकोल्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्याही ११३६  झाली आहे. दरम्यान, आज दुपारी आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ३३५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णआढळून येत असून, कोरोनाच्या बळींचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११०६ होती. शुक्रवारी यामध्ये ३० रुग्णांची भर पडत हा आकडा ११३६ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात एकून २७७ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळच्या १५ पॉझिटिव्ह अहवालात आठ महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील चार, तर जेतवन नगर,कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर,मोठी उमरी ,बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील अकोट फैल येथील तिन, सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, अकोट, बाळापूर, हरिहर पेठ, आंबेडकर चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यूगुरुवारी रात्री उपचार घेताना एका ८२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. सद व्यक्ती हरीहरपेठ, अकोला येथील असून, त्यांना गुरुवारीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ झाला आहे.आणखी १८ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील ११ जणांना घरी तर सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ३३५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल- २७७पॉझिटीव्ह-३०निगेटीव्ह-२४७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-११३६मयत-५९ (५८+१), डिस्चार्ज- ७४२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३५