शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अकोल्यात कोरोनाबधितांचा आकडा ३०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:38 IST

कोरोनाबधितांचा आकडा ३०८ झाला आहे.

अकोला : गत चार दिवसांत शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून, बुधवारी बाधितांचा आकडा ३०८ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे आता शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ९० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली नाहीत. अशा परिस्थितीत अकोलेकरांना कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरपासून सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे शहरात चौफेर कोरोनाचं जाळं पसरलं आहे. बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रयनगर डाबकीरोड,  तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड,  आळसी प्लॉट,  कच्ची खोली सिंधी कॅम्प,  खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीमचौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट,  अकोट फैल,  माळीपुरा,  पंचशिलनगर वाशिम बायपास रोड,  नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी दोन न्यू तारफैल, दोन जण समतानगर येथील रहिवासी आहेत. तसेच उर्वरीत खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मीनगर, देशमुख फैल, अडगाव (ता.अकोट) , पुरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत. तर २३ जणांनी कोरोनावर मात केली असून, मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता १२१ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

२१८ अहवाल निगेटिव्हकोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या प्रलंबित अहवालापैकी २४७ अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह , तर २१८ अहवाल निगेटिव्ह आले. 

अशी आहे स्थिती एकूण कोरोनाबाधित रुग्ण - ३०८अ‍ॅक्टिव्ह रूग्ण             - १२१मृत्यू झालेले रुग्ण         - २० (एकाची आत्महत्या)कोरोनामुक्त                - १६७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला