शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दीड वर्षीय बालकासह आणखी चार पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १६३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:00 IST

चारही रुग्ण हे तारफैल भागातील भवानीपेठ परिसरातील असल्याची माहीती आहे.

ठळक मुद्देदीड वर्षाचा बालक, आठ वर्षाचा मुलगा, २३ वर्षीय महिला व ६२ वर्षाचा पुरुष यांचा समावेश. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६३ वर पोहचली आहे.

अकोला : शहरातील कोरोना संसर्गाची बाधा होणाऱ्यांची संख्या वाढतच असून, मंगळवार, १२ मे रोजी यामध्ये आणखी चौघांची भर पडली आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालांनूसार दीड वर्षीय बालकासह चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. चारही रुग्ण हे तारफैल भागातील भवानीपेठ परिसरातील असल्याची माहीती आहे. यामध्ये दीड वर्षाचा बालक, आठ वर्षाचा मुलगा, २३ वर्षीय महिला व ६२ वर्षाचा पुरुष यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चार नवे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६३ वर पोहचली आहे.पश्चिम वºहाडात अकोला शहर हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरले आहे. पहिला रुग्ण सात एप्रिल रोजी आढळलेल्या अकोल्यात महिनाभरात दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत; परंतु रुग्णांची संख्या मात्र कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. अकोला शहराती बैदपूरा हा कोरोनाचा केंद्रबिंदू ठरत असला, तरी आता इतरही भागात झपाट्याने संसर्ग होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बुधवार, १२ मे रोजी एकून ५० संदिग्ध रुग्णांचे अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले. यामध्ये चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकून कोरोनाबाधितांचा आकडा १६३ झाला आहे. आतापर्यंत १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १३ जणांचे कोविड-१९ आजाराने नैसर्गिक मृत्यू, तर एका कोरोनाबाधिताची आत्महत्या, अशा १४ मृत्यूंची नोंद प्रशासनाकडे आहे. आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात एकूण १३५ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.आज प्राप्त अहवाल- ५०पॉझिटीव्ह-चारनिगेटीव्ह-४६अशी आहे सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल - १६३मयत-१४(१३+१),डिस्चार्ज - १४दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १३५

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला