शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : साडेपाचशेचा टप्पा ओलांडला; दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह; एकूण बाधित ५५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:05 IST

दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे

ठळक मुद्देशुक्रवार, २९ एप्रिल रोजी दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे.आता १४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याचे सत्र सुरुच असून,  शुक्रवार, २९ एप्रिल रोजी  दिवसभरात  आणखी ४२   रुग्णांची भर पडली.  यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या  ५५८  झाली आहे.  यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू, तर ३८९  रुग्णांना उिस्चार्ज देण्यात आल्याने आता  १४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्याच गेले आहेत. गुरुवार, २८ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५१६ होता. यामध्ये शुक्रवारी ४२ रुग्णांची भर पडत हा आकडा ५५८ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून  शुक्रवारी २७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर २३४  जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये १७ महिला व २७    पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये  दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड,  गोरक्षण रोड,  जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये   गायत्रीनगर येथील सात, कौलखेड येथील चार,  रामदास पेठ येथील दोन, मोठी उमरी येथील दोन,  सोनटक्के प्लॉट येथील दोन,  रजपुतपुरा येथील दोन,  अकोट फैल येथील दोन, जुने शहर येथील दोन तर न्यु तारफैल, हिंगणा रोड,  बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट,  मोमीनपुरा, काला चबुतरा,  खदान,  सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी २८ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. 

३९ जणांना ‘डिस्चार्ज’एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाºयांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३८८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला