शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

CoronaVirus : अकोल्यात आणखी आठ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ५२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:13 IST

शुक्रवार, २९ एप्रिल रोजी यामध्ये आठ नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देशुक्रवारी आठ रुग्णांची भर पडत हा आकडा ५२४ वर गेला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत.

अकोला : कोरोना संसर्गाचा विदर्भातील हॉटस्पाट म्हणून उदयास आलेल्या अकोला जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, २९ एप्रिल रोजी यामध्ये आठ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी आणखी आठ नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५२४ झाली आहे. यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू, तर ३४९ रुग्ण बरे झाल्याने आता १४६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सकाळी दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्याच गेले आहेत. गुरुवार, २८ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५१६ होता. यामध्ये शुक्रवारी आठ रुग्णांची भर पडत हा आकडा ५२४ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शुक्रवारी १५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.तेल्हारा तालुक्यात आणखी दोन रुग्णसंपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना तेल्हारा तालुका मात्र अलिप्त राहिला होता. गत आठवड्यात पाच रुग्ण आढळून आले होते. ते बरे झाल्यानंतर तालुका कोरोनामुक्त झाला होता. आता तेल्हारा शहर व बेलखेड येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत.समुह संक्रमणाचा धोका वाढलाजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अकोला शहरात तर सर्वच प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे अकोलेकरांनी खबरदारी राखण्याची गरज आहे.प्राप्त अहवाल-१५७पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-१४९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-५२४मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४६

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या