शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आठ दिवस: ४ हजारांवर चाचण्या; २९८ ‘पॉझिटिव्ह’, ७ मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 10:21 IST

रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर प्रणालीद्वारे ४ हजार २३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने चाचण्यांचा वेगही वाढला आहे. गत आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर प्रणालीद्वारे ४ हजार २३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना, आता ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे अकोला शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ‘आरटीपीसीआर’ प्रणालीद्वारे संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. कोरोना विरुद्धचा लढा आणखी सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट’ची मदत घेतली जात आहे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत गत आठ दिवसांमध्ये तब्बल दोन हजार ८३८ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ‘रॅपिड टेस्ट’मुळे गत आठ दिवसात जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या मोहिमेची मोठी मदत होणार आहे.आरटीपीसीआरद्वारे २,८३८ चाचण्या!आतापर्यंत केवळ ‘आरटीपीसीआर’ प्रणालीद्वारे चाचण्या घेण्यात येत होत्या. या प्रणालीनुसार आठ दिवसांत केवळ १,४०५ चाचण्या करण्यात आल्या; मात्र चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट’ची मदत घेण्यात आल्याने गत आठ दिवसात २,८२८ चाचण्या अतिरिक्त झाल्या आहेत.

आठ दिवसातला मृत्यूदर २.१!गत आठ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी गेले, तर २९८ जण पॉझिटिव्ह आले. त्यानुसार गत आठ दिवसात जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा २.१ वर आहे; मात्र एकूण मृत्यूचा विचार केल्यास जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा ४.५७ आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या