शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ९ पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ५१६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST

दिवसभरात एकाचा मृत्यू व नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्दे८० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आज आणखी ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१३४ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असून रुग्ण वाढ़ीचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी आंणखी एकाचा बळी गेला आहे. तसेच ९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५१६ रुग्ण आढळून आल्याने अकोलेकरांचा धोका आणखी वाढला आहे. वाढ़त्या समूह संक्रमणापासुन बचावासाठी नागरीकांनी स्वतः हून नियमांचे पालन करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून समूह संक्रमणाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. त्यामुळे अकोलेकरांनी खबरदारी राखण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कोरोना चा उद्रेक वाढत असून गुरुवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८० वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच आंणखी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा ४६ वर्षीय पुरुष असून सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहे.तर सायंकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. हे रुग्ण सनगर कॉलनी वाशीम बायपास, राऊतवाडी, गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प, कमलानेहरुनगर, हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रोड मलकापूर येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत कोरोना मुळे २९ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१६ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही २५ झाला आहे. सद्यस्थितीत १४८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.रविवारी ३४ जणांना ‘डिस्चार्ज’एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाºयांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.१९२ अहवाल निगेटिव्ह बुधवारी दिवसभरात प्राप्त २०१ अहवाला पैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत .तर १९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .अशी आहे स्थिती एकूण पॉझिटिव्ह - ५१६मृत्यू - २९कोरोना मुक्त - ३४९ॲक्टिव्ह रुग्ण - १३४--------------
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या