शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३७ नवे पॉझिटिव्ह, १६ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:15 IST

बोरगाव मंजु व पोपटखेड येथील दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४६ वर पोहचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. बुधवार, २६ आॅगस्ट रोजी बोरगाव मंजु व पोपटखेड येथील दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४६ वर पोहचला आहे. दिवसभरात आणखी ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३,६२५ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १७१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, १३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३७ जणांमध्ये १४ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या मुर्तीजापूर शहरातील ३१ जणांचा समावेश असून, उर्वरित सहा जणांंमध्ये पातूर तालुक्यातील चरणगाव येथील दोन, तेल्हारा येथील दोन, तर कृषी नगर व आसेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.बोरगाव मंजू , पोपटखेड येथील दोघे दगावलेकोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाºयांची वाढती संख्या चिंताजनक आहे. बोरगाव मंजू येथील ८७ वर्षीय पुरुषाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट तालुक्यातील पोपटखेड येथील ८६ वर्षीय पुरुषाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.१६ जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४०९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,६२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०७० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४०९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला