शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ९८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:43 IST

१३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देकोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९८५ झाली आहे.सद्यस्थितीत ३१४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार, १३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे. तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९८५ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख प्राप्त झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात १०१ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत, तर उर्वरित ८९ अहवाल निगेटिव्ह आहेत.   पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी रजपुतपुरा, बलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेड, हरिहरपेठ व बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सांयकाळी हरिहरपेठ, अकोट फैल, मोठी उमरी,चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.दोन महिला दगावल्यादरम्यान, शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही मयत महिला आहेत. त्यापैकी एक ५२ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून, १० जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. जुने शहरातील देशपांडे प्लॉट भागातील ८० वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. सदर महिलेस ८ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दोन मृत्यूमुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर पोहचला आहे. यापैकी ४५ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.आणखी १९ जणांना डिस्चार्जशनिवारी सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत. यापैकी सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये दोन खडकी, दोन रामदास पेठ, दोन ध्रुव अपार्टमेंट, दोन सिंधी कॅम्प येथील, तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आलेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपूरा, रणपिसेनगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३१४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

प्राप्त अहवाल-१०१पॉझिटीव्ह-१२निगेटीव्ह-८९

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-९८५मयत-४६(४५+१),डिस्चार्ज-६२५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३१४

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या