शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ‘ते’ पॉझिटिव्ह रुग्ण परतले होते घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:39 IST

तातडीने भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करणे अपेक्षित असताना त्यांच्यावर रात्री ११ वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होण्यासाठी उपस्थित झालेल्या रुग्णांना वॉर्ड क्रमांक २४ मध्ये कोणीही दाखल करून घेत नसल्याचे पाहून संबंधित चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घर गाठताच नगरसेवकांसह मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री अकोट फैल परिसरातील भीम चौक परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या भीम चौक परिसरातील काही संशयित रुग्णांचे महापालिकेने नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठवले. यापैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल १८ मे रोजी सायंकाळी समोर आला.प्राप्त अहवालानुसार मनपाच्या मार्फत संबंधित चारही रुग्णांना उपचारासाठी रात्री ८ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.संबंधित रुग्णांना वॉर्ड क्रमांक २४ मध्ये तातडीने भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करणे अपेक्षित असताना त्यांच्यावर रात्री ११ वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली. यामुळे संबंधित चारही रुग्णांनी रात्री घर गाठले.हा प्रकार प्रभागाचे नगरसेवक पराग कांबळे, नगरसेविका चांदणी शिंदे व त्यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत संपर्क साधला. कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून परत आल्याची बाब गंभीरतेने घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी रात्री जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने हालचाली करीत रात्री रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या