शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरुच; दिवसभरात एकाचा मृत्यू,५९ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९७३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:01 IST

शुक्रवार, १२ मे रोजी बाळापूरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदिवसभरात ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. बळींचा आकडा ४४, तर एकूण बाधितांचा आकडा ९७३ वर पोहचला.सद्यस्थितीत ३२३ जणांवर उपचार सुरु आहे.

अकोला : विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचा हैदोस सुरुच असून, शुक्रवार, १२ मे रोजी बाळापूरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४४, तर एकूण बाधितांचा आकडा ९७३ वर पोहचला आहे. दरम्यान गत २४ तासात आणखी २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी १९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १३१ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथिल तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषिमातामंदिर जवळ, छोटी उमरी, गीतानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. त्यात एका दोन महिने वयाच्या बालिकेसह नऊ महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे.  त्यातील चार जण हे  रंगारहट्टी बाळापूर  येथील रहिवासी आहेत. उर्वरीत बाळापुर, सिंदखेड ता. बार्शी टाकळी, विजयनगर, हमजा प्लॉट, चैतन्य नगर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बाळापूरातील एकाचा मृत्यूगुरुवारी रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेताना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या ४४ वर पोहचली आहे. यापैकी ४३ जणांचा कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झाला. तर एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे.

२९ जणांना डिस्चार्जगुरुवारी रात्री नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात ११ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ६०६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता ३२३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-९७३मयत-४४(४३+१),डिस्चार्ज-६०६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२३

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या