शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus in Akola : दिवसभरात एक मृत्यू; २४ पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा ३४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 6:08 PM

सोमवार, १ जून रोजी यामध्ये २४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देफिरदौस कॉलनी परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, सोमवार, १ जून रोजी यामध्ये २४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर दुपारी फिरदौस कॉलनी परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६०५ झाली असून, मृतकांचा आकडाही ३४ वर गेला आहे. दरम्यान, सोमवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. रविवार, ३१ मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५८१ होती. यामध्ये सोमवारी आणखी २४ रुग्णांची भर पडून हा आकडा ६०५ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून सोमवारी दिवसभरात १०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकट पोलीस लाईन, नुरानी मशिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व पोपटवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी फिरदौस कॉलनी परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सदरमहिलेला २९ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत ३४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचाही समावेश आहे. आतापर्यंत ४४२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आता १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

सोमवारी १० जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाºयांचा आकडाही दिलासा देणारा आहे. सोमवारी दुपारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना घरी तर उर्वरीत आठ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्राप्त अहवाल-१०७पॉझिटीव्ह-२४निगेटीव्ह-८३ एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६०५मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४४२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३० 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या