शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, एकूण आकडा ५७० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:39 IST

आणखी १२.पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत हा आकडा ५७० वर गेला आहे.

ठळक मुद्देशनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ महिला व चारपुरुषांचा समावेश आहे. शनिवारी आणखी ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच असून, शनिवार, ३० मे रोजी यामध्ये आणखी १२.पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत हा आकडा ५७० वर गेला आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे. शनिवारी आणखी ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ११७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी  दिली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असले, तरी कोरोनासंसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शुक्रवार, २९ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५८ होता. यामध्ये शनिवारी नव्या १२ रुग्णांची भर पडत हा आकडा वर ५७० गेला आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात अहवाल १२३ प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर १११ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ महिला व चारपुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे अकोट फैल, गायत्रीनगर, सिटी कोतवाली, मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत. दरम्यान, डाबकी रोड भागातील साई नगरातील एका व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २४ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

३५ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर  ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित ३० जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.

११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५७०  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३० जण (एक आत्महत्या व २९ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज ३५ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४२३  झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर आज एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या