शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : रुग्णवाढीचा वेग अन् वाढता मृत्यूदर चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:15 IST

नागपूरसारख्या विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातही रुग्णवाढीचा वेग हा अकोल्याच्या तुलनेत कमी आहे.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक चिंताजनक व चर्चेचाही ठरला आहे. अकोल्यात रुग्णवाढीचा वेग धक्कादायक आहेच; मात्र त्यासोबतच मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचीही संख्या विदर्भात सर्वाधिक नोंदविली गेली आहे.कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ अशी अकोल्याची ओळख या वाढत्या रुग्ण संख्येमुळे झाली आहे. नागपूरसारख्या विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातही रुग्णवाढीचा वेग हा अकोल्याच्या तुलनेत कमी आहे. नागपूरमध्ये ३०० रुग्णांचा टप्पा हा ६३ दिवसांत गाठला होता.अकोल्यात मात्र अवघ्या ४३ दिवसांतच ३०० च्या वर रुग्ण संख्या झाली असून, आता चारशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात पहिला रुग्ण हा ११ मार्च रोजी आढळला होता. अकोल्यात ७ एप्रिलपासून सुरुवात झाली. नागपूरपेक्षा तब्बल महिनाभर उशिराने रुग्ण आढळूनही अकोला आता नागपूरपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाग्रस्त होत आहे.नागपुरात ७८ टक्के, अकोल्यात ५८ टक्के ‘कोरोना’मुक्तनागपुरात शुक्रवार दुपारपर्यंत ३९५ रुग्ण व ३१० ‘कोरोना’मुक्त तर अकोल्यात ३२४ रुग्ण व १९१ ‘कोरोना’मुक्तांची नोंद होती. टक्केवारीनुसार नागपुरात ७८.४८ टक्के तर अकोल्यात ५८.९५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले.अमरावतीपेक्षाही अधिक बळीविदर्भात अकोल्यामध्ये कोरोना बळींची संख्या सर्वाधिक आहे. शुक्रवारपर्यंत तब्बल कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहेत. यापैकी २२ जणांचा मृत्यू ‘कोविड-१९’ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्याखालोखाल अमरावतीमध्ये १३ बळी गेले असून, नागपुरात केवळ ७ तर ११२ रुग्ण आढळलेल्या यवतमाळमध्ये कोणलाही जीव गमावावा लागलेला नाही.‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्णांमध्येही अकोलाच अव्वल!नागपूर, अमरावती व यवतमाळ हे विदर्भात सर्वाधिक रुग्ण असणारे जिल्हे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत उपचार सुरू असलेले अर्थात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये अकोल्याची संख्या सर्वाधिक आहे.शुक्रवार संध्याकाळपर्यंत अकोल्यात.... ..रूग्ण होते. तर हीच संख्या नागपुरात १११, यवतमाळमध्ये केवळ १५ एवढी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या