शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुऱ्यातच होणार आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 10:20 IST

काश्मीर लॉज येथे बैदपुरावासीयांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे समोर आले आहे. या भागातून कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रविवारी फतेह अली चौकातील काश्मीर लॉज येथे बैदपुरावासीयांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या तपासणीसाठी प्रभागाचे नगरसेवक तथा डॉ.जिशान हुसेन यांनी पुढाकार घेतला आहे.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ च्या परिसरातून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. या प्रभागातील बैदपुरा, ताजनापेठ, मोमिनपुरा, फतेह अली चौक, कलाल चाळ आदी भागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या समोर येत आहे. बैदपुरा परिसरातीलच एक महिला रुग्ण तपासणीसाठी जयहिंद चौकमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. सदर महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मनपा प्रशासनाने जयहिंद चौकातील खासगी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व इतर चार जणांची आरोग्य तपासणी केली असता डॉक्टरसह ते सर्व पाचही जण कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे प्रशासनाला जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठ, प्रभाग क्रमांक १८ तसेच पूर्व झोनमधील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाºया सुधीर कॉलनी व शिवर परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे लागले होते. एकूणच प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे लक्षात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रभागातील सर्व नागरिकांची फतेह अली चौकातील काश्मीर लॉज येथे आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय पथकाचे गठन करण्यात आले आहे.मनपाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती४प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या तपासणीसाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी रविवारी मनपाच्या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केली. यामध्ये मनपाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, डॉ. विजय चव्हाण, डॉ. सदफ खान, डॉ. मोहिते, डॉ. मुसलोद्दीन व डॉ. वासिक अली यांचा समावेश आहे.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांची या परिसरामध्येच आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला