शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola :  दिवसभरात चौघांचा मृत्यू; सात पॉझिटिव्ह, ८५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 18:16 IST

CoronaVirus in Akola: आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, ९ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७६० झाली आहे. दरम्यान, ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉर्टर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.उपचारादरम्यान चौघे दगावलेशुक्रवारी आणखी चौघांंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये निंभोरा येथील ५६ वर्षीय पुरुष, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष व वाडेगाव, ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. उपरोक्त चौघांनाही अनुक्रमे ७ आॅक्टोबर, १८ सप्टेंबर, २३ सप्टेंबर व २९ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.८५ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून पाच, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अवधाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक , हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होमक्वारंटीनचा कालावधी पूर्ण झालेले ५० अशा एकूण ८५ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.७२७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६७८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला