शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : २१ दिवसात दुपटीने मृत्यू : नागपूरच्या तुलनेत ३.९ ने जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 09:57 IST

अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत २० दिवसांत कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढली आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ५.५ टक्क्यांवर पोहोचला असून, नागपूरच्या तुलनेत ३.९ ने जास्त आहे. हा विदर्भातील सर्वाधिक मृत्यूदर आहे. धक्कादायक बाब म्हणजे गत २१ दिवसांतच मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे.७ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. अतिशय संथ गतीने रुग्णवाढ सुरू असताना ११ एप्रिल रोजी एका पॉझिटिव्ह रुग्णाने उपचारादरम्यान आत्महत्या केली होती.त्यानंतर लगेच चौथ्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. ३१ एप्रिलपर्यंत मृत्यूचा आकडा ४ होता; मात्र मे महिन्यात मृत्यूची संख्या झपाट्याने वाढू लागली. मे महिन्यात दिवसाला सरासरी एकाचा मृत्यू या प्रमाणे ३० दिवसात २८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला; मात्र कोरोनाने जूनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली असून, २० दिवसांतच मृत्यूचा आकडा दुपटीने वाढविला.एप्रिल, मे या ६१ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या ३२ वर पोहोचली होती. तर जूनमध्ये ३४ चा आकडा गाठण्यासाठी केवळ २१ दिवसांचाच कालावधी लागला. कोरोनाचा हा मृत्यूदर विदर्भात सर्वाधिक असून, अकोलेकरांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

सर्वाधिक रुग्ण ५० वर्षावरीलमृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ५० वर्षावरील वयोगटातील आहे. या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार, हृदयविकार यासह इतर गंभीर स्वरूपाचेही आजार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या