शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:05 IST

पातूर तालुक्यातील कापशी तलाव, व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६५ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने संसर्ग होणाऱ्यांंची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी पातूर तालुक्यातील कापशी तलाव, व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६५ झाली आहे. तर आणखी ८१ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४४४९ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये ३१ महिला व ५० पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील तांदळी येथील ३८ जणांसह, पिंजर येथील १२ जण, भटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूका नगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.कापशी, मुर्तीजापूरातील रुग्णांचा मृत्यूशनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर तालुक्यातील कापसी तलाव येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेस २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचाही बुधवारी मृत्यू झाला. त्यांनाही २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.९१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,४४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या