शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Coronavirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा १३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:58 IST

६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १३ झाली आहे.

ठळक मुद्देसोमवारी दिवसभरात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर.आयसोलेशन कक्षात १३१ जणांवर उपचार सुरु.

अकोला : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव थांबावा यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र या जीवघेण्या आजाराच्या बळींची संख्याही वाढतच आहे. सोमवार, ११ मे रोजी बैदपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १३ झाली आहे. या रुग्णाला २ मे रोजी दाखल करण्यात आले होते. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद असल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंचा आकडा १४ आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर पोहचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी जाहीर करण्यात आले.रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात यामध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे. सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोग शाळेकडून एकूण ९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच पॉझिटिव्ह, तर ९० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये मोठी उमरी भागातील एक पोलिस, तर किल्ला चौक भागातील ११ वर्षीय बालकाचा समावेश आहे. सायंकाळी आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये आंबेडकर नगर सिव्हिल लाईन्स भागातील २६ वर्षीय युवक,अगरवेस जुने शहर भगातील ५६ वर्षीय महिला व अकोट फैल भागातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात १३१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आज प्राप्त अहवाल-९५पॉझिटीव्ह-पाचनिगेटीव्ह-९०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- १५९मयत-१४(१३+१),डिस्चार्ज- १४दाखल रुग्ण( पॉझिटिव्ह)- १३१

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला