शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटीव्ह; मृत व्यक्तीच्या मुलालाही कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 11:34 IST

अकोला शहरातील एका १४ वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सांगण्यात आले.

अकोला : जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या फेर तपासणीचे अहवाल निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे मात्र नवे रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी आणखी भर पडली असून, अकोला शहरातील एका १४ वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सांगण्यात आले. कोरोनामुळे १३ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा हा मुलगा असून, त्याची चाचणी केल्यानंतर तोदेखील पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी या मुलाची १७ वर्षीय बहिणही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. या दोघांचीही प्रकृती सद्या स्थिर असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या १५ होती. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता,तर एका रुग्णाने आत्महत्या केली होती. उर्वरीत १२ रुग्णांची गत दोन दिवसांपूर्वी फेरतपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, तर एका तीन वर्षीय चिमुकल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना बाधितांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असतानाच रविवारी आणखी एका १४ वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे चिंता वाढली असली, तरी दुसरीकडे रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने झालेली सुधारणा दिलासा देणारी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या