शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५९ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:51 IST

शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे शुक्रवार, १९ जून रोजी १५ नवे पॉझिटिव्ह समोर आले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ वर गेला आहे. एकूण बाधितांची संख्याही ११२१ झाली आहे.

अकोला: अकोल्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर १५ नवे पॉझिटिव्ह समोर आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्याही ११२१ झाली आहे. दरम्यान, सद्या ३३८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सकाळी सांगण्यात आले.विदर्भातील दुसºया क्रमांकाचा कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढतच आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११०६ होती. शुक्रवारी यामध्ये १५ रुग्णांची भर पडत हा आकडा ११२१ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी एकून २१६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. १५ पॉझिटिव्ह अहवालात आठ महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील चार, तर जेतवन नगर, कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.दरम्यान, गुरुवारी रात्री उपचार घेताना आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर ८२ वर्षीय ही व्यक्ती हरीहरपेठ, अकोला येथील असून, त्यांना गुरुवारीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ झाला आहे.आतापर्यंत ७२४ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात आतापर्यंत ७२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ३३८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल-२१६पॉझिटीव्ह-१५निगेटीव्ह-२०१आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११२१मयत-५९(५८+१), डिस्चार्ज- ७२४दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३३८

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला