शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात ६७ पॉझिटिव्ह, १५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:22 IST

CoronaVirus in Akola: ६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,६९७ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआरटीपीसीआर चाचण्यांचे १००४ अहवाल प्राप्त झाले.५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सद्य:स्थितीत ५१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोराेनाचा कहर सुरूच असून मंगळवार, ५ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १० असे एकूण ६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,६९७ वर पोहोचली आहे. दरम्यान १५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १००४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, श्रीराम चौक, जुने शहर, न्यू खेतान नगर, सावकार नगर, रजपूतपुरा, खडकी, राधे नगर, अकोट, बाळापूर नाका, मूर्तिजापूर, गीता नगर, खडकी, राम नगर, छोटी उमरी, रणपिसे नगर व सिव्हिल लाइन येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी तेल्हारा येथील चार, अकोट येथील तीन, गोरक्षण रोड येथील दोन, नकाशी ता. बाळापूर,बाळापूर नाका, वाडेगाव, पिंपरी जैनपूर ता. अकोट, शिव वडनेर ता. तेल्हारा, दहीगाव ता. तेल्हारा, हिवरखेड ता. तेल्हारा, श्रीनाथ मनब्दा ता. तेल्हारा, अडसुळ ता. तेल्हारा, दुर्गा चौक, चौरे प्लॉट, कौलखेड, कॉग्रेस नगर, बलवंत नगर, जवाहर नगर, वर्धमान नगर, नालंदा नगर, अडसना, हिंगणा रोड, भांडपुरा चौक व सोमठाना येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

१५ जणांना डिस्चार्ज

मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रेजेन्सी येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले चार, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,६९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला