शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Coronavirus in Akola : आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:58 IST

गुरुवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये व्हीआरडीएल लॅबमधील ५५, तर रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच असून, गुरुवारी त्यात आणखी ६५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जास्त असल्याने ही ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये व्हीआरडीएल लॅबमधील ५५, तर रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. सलग चार महिन्यांपासून रुग्णसंख्येतील वाढ थांबण्याचे चिन्ह दिसून येत नाही. जून, जुलैप्रमाणेच आॅगस्ट महिन्यातही हा वेग कायम असून, गुरुवारी आणखी ६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील ५५ अहवाल व्हीआरडीएल लॅबमधील आहेत. यामध्ये ३२ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात अकोट येथील १२, आगर ता. अकोला येथील सात, शास्त्रीनगर सहा, सिंधी कॅम्प चार, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील तीन तर रामनगर, कौलखेड, शिवणी, वाशिम बायपास, जुना कॉटन मार्केट, गणेश नगर, गोरक्षण रोड, डाळंबी ता. अकोला व सांगवा मेळ ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी वाडेगाव येथील नऊ, रिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शीटाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या २,८९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर २,३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातून दोन, तर खासगी रुग्णालयातून सहा, अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या