शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात ५१ पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:32 IST

सोमवार, २२ जून रोजी दिवसभरात ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४३ झाली आहे.

ठळक मुद्दे१९४ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.सोमवारी दुपारनंतर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून, सोमवार, २२ जून रोजी दिवसभरात ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४३ झाली आहे. दरम्यान, आज आणखी तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ४१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात एकूण १९४ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ४८ जणांमध्ये २२ महिला व २६ पुरुष आहेत. यामध्ये बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तीन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळाशे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. आज सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते सिदाजी वेटाळ पातूर, राजपूतपुरा, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, आतापर्यंत ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.तिन महिलांना डिस्चार्जदरम्यान, सोमवारी दुपारनंतर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिनही महिला असून, तिघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या भांडपुरा, हमजा प्लॉट आणि वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत.

४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत १२४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६६ जण (एक आत्महत्या व ६५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या ७६५आहे. तर सद्यस्थितीत ४१२   पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल- १९४पॉझिटीव्ह- ५१निगेटीव्ह- १४३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४३मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला