शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ४० पॉझिटिव्ह; १६ जणांना डिस्चार्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 18:36 IST

बुधवार, ३ जून रोजी दिवसभरात ४० जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६७ झाली आहे.

ठळक मुद्देदुपारी आणखी १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. ‘व्हीआरडीएल लॅब’कडून बुधवारी १३८ अहवाल प्राप्त झाले. ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९८ अहवाल निगेटिव्ह आहेत.

अकोला : अकोल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ३ जून रोजी दिवसभरात ४० जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६७ झाली आहे. बुधवारी सकाळी ३६ जणांचे तर सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, दुपारी आणखी १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४७८ बरे झाल्याने सद्यस्थितीत १५५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.अकोला जिल्ह्यात कोरोना प्रचंड वेगाने हातपाय पसरत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. मंगळवार, २ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६२७ होती. यामध्ये बुधवारी आणखी ४० रुग्णांची भर पडून हा आकडा ६६७ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून बुधवारी १३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ महिला व २२ पुरुष आहेत. त्यातील ११ जण अकोट फैल येथील, पाच जण देशमुख फैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फैल येथील तीन तर पाककरपुरा अकोट, अनिकट, बलोदे ले आउट -हिंगणघाट रोड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार पुरा, तार फैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांपैकी चार जण पॉझिटिव्ह असून, त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते खदान, अकोट फैल, शिवाजी नगर, संताजी नगर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे.आणखी १६ जण झाले बरेदुपारनंतर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील पाच जण रामदास पेठ येथील , तीन जण अकोट फैल येथील तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूत पुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. डिस्चार्ज दिलेल्या १६ जणांपैकी तीन जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित १३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

 

प्राप्त अहवाल-१३८पॉझिटीव्ह-४०निगेटीव्ह-९८आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-६६७मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४७८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५५

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या