शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी ४० पॉझिटिव्ह; १९ जणांना डिस्चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:04 IST

बुधवार, २२ जुलै रोजी दिवसभरात आणखी ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तीन दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची उपाययोजना केल्यानंतरही या संसर्गजन्य आजाराचा धुमाकुळ सुरुच असून, बुधवार, २२ जुलै रोजी दिवसभरात आणखी ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या २२४६ झाली आहे. दरम्यान, १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या ३४४ जणांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये २४ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १६ जण हे पातूर येथील, तीन जण हिवरखेड येथील, बोरगांव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहाँगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन, तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी वसतीगृह, खडकी, विजय नगर, न्यु भीम नगर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.१९ जणांना डिस्चार्जबुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून एक जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली.

३४४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण २२४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला