शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
3
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
4
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
5
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
6
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
7
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
8
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
9
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
10
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
11
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
12
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
13
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
14
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
15
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
16
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
17
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
18
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
19
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
20
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर

CoronaVirus in Akola : दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह; ५७ जण बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 7:17 PM

शुक्रवार, २६ जून रोजी दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देशुक्रवारी  २४२ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सद्यस्थितीत २४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २६ जून रोजी दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३६४ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी  २४२ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण  अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल,  दोघे हरिहर पेठ येथील, तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट,  आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर,  तारफैल,  इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत. ते सिंधी कॅम्प, दशहरा नगर आणि बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

५७  जणांना डिस्चार्जआज दिवसभरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ५७ रुग्णात तारफैल येथील सात जण, गायत्रीनगर येथील सहा जण, सिंधी कॅम्प येथील पाच जण, हरिहरपेठ येथील पाच जण, मोठी उमरी येथील पाच जण, रामदास पेठ येथील पाच जण,आदर्श कॉलनी येथील तीन जण, न्यू तारफैल येथील दोन, खदान येथील दोन, बाळापूर येथील दोन, तर रजपुतपुरा, चांदुर, शिवसेना वसाहत, अकोट फैल, अशोक नगर, कैलास टेकडी, खोलेश्वर, गोकुळ कॉलनी, मोहता मिल, रेल्वे स्टेशन, माळीपूरा, खैर मोहम्मद प्लॉट, शिवाजी नगर, लहान उमरी, अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.

२४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १३६४ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत २४३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या