शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Akola : आणखी २० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २९९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:38 IST

अकोल्यात आणखी २० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

अकोला : गत चार दिवसांपासून शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहे. मंगळवारपाठोपाठ बुधवारीही २० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २९९ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण हे नविन परिसरातही आढळून येत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ९० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली नाहीत. अशा परिस्थितीत अकोलेकरांना कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरपासून सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे शहरात चौफेर कोरोनाचं जाळं पसरलं आहे. बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रयनगर डाबकीरोड,  तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड,  आळसी प्लॉट,  कच्ची खोली सिंधी कॅम्प,  खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीमचौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट,  अकोट फैल,  माळीपुरा,  पंचशिलनगर वाशिम बायपास रोड,  नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर २३ जणांनी कोरोनावर मात केली असून, मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ११२ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

१०४ अहवाल निगेटिव्हकोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या प्रलंबित अहवालापैकी १२४ अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी २० अहवाल पॉझिटिव्ह , तर १०४ अहवाल निगेटिव्ह आले. 

अशी आहे स्थिती एकूण कोरोनाबाधित रुग्ण - २९९अ‍ॅक्टिव्ह रूग्ण             - ११२मृत्यू झालेले रुग्ण         - २० (एकाची आत्महत्या)कोरोनामुक्त                - १६७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला