शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:03 IST

बुधवार, १७ जून रोजी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०९२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देबुधवारी एकूण ९१ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७२ अहवाल निगेटिव्ह आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. बुधवार, १७ जून रोजी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०९२ वर पोहचली आहे. दरम्यान, बुधवारी आणखी ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०७३ होता. यामध्ये बुधवारी आणखी १९ जणांची भर पडत हा आकडा १०९२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ९१ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये नऊ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील, तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शीटाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांपैकी दहा जण पॉझिटिव्ह असून, यामध्ये पाच जण समतानगर तारफैल येथील, तीन जण खदान येथील तर शिवनी येथील व कारंजा जि. वाशिम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.

३१ जणांना डिस्चार्जबुधवाारी दुपारी ३१ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला . त्यात १७ जणांना घरी सोडण्यात आले तर १४ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात २२ पुरुष आणि नऊ महिला आहेत. त्यात जीएमसी क्वार्टर येथील चार जण, गुलजार पुरा येथील तीन, तारफैल येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, जुने शहर येथील दोन, सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, बेलोदे लेआऊट येथील दोन तर  देवी पोलीस लाईन, बाळापूर, गोरक्षण रोड, काळा मारुती, रामदास पेठ, मोहता मिल,  बंजारा नगर, लक्ष्मी नगर, गायत्री नगर, अकोट फैल, खदान, वाशीम बायपास, सिव्हील लाईन, शिवसेना वसाहत  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत एकूण ७०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल आहे.प्राप्त अहवाल-९१पॉझिटीव्ह-१९निगेटीव्ह-७२

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०९२मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-७०७दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२९

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या