शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 10:19 IST

आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत.

- राजेश शेगोकारअकोला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. एकीकडे रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा यांचा ताळमेळ जुळविताना दमछाक होत असलेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता ऑक्सिजनच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सध्या जिल्ह्यात आॅक्सिजनची मागणी तिपटीने वाढली असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीमध्ये रुग्णांचा श्वास गुदमरण्याआधीच आॅक्सिजन उपलब्धता करावी लागणार असून, त्यासाठी आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत.अकोल्यात आॅक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे लगतच्या वाशिम व बुलडाण्यातही अकोल्यातूनच पुरवठा केला जात असल्याने सध्या आॅक्सिजनचा तुटवडा भासत आहे.कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, आॅक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. सोमवारी एका खासगी रुग्णालयात आॅक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली होती. त्यावेळी सर्वोपचार रुग्णालयातून काही सिलिंडरचा पुरवठा करावा लागला होता. कुठे तयार होते लिक्वीडआॅक्सिजनची निर्मिती करण्यासाठी लागणारे लिक्वीड हे नागपूर येथून बोलविण्यात येते. या लिक्वीड चा एक टँकर हा ८ किलो लीटर क्षमतेचा असतो. हे लिक्वीड कॉम्प्रेस करून आॅक्सिजन तयार केले जाते. एका टँकरमधून तयार केलेल्या आॅक्सिजनमध्ये साधारणपणे ९०० ते ९५० सिलिंडर भरले जातात. सद्यस्थितीत लिक्वीडचा पुरवठा करण्याऱ्या प्लांटवरही ताण वाढला असल्याने मागणीची पूर्तता होण्यात अडचणी येत आहेत. नागपूरनंतर लिक्वीड तयार करणारे असे प्लांट पुणे, ठाणे येथेच आहेत. 

एक ऐवजी हवेत चार टँकरशासकीय रुग्णांलयांसाठी होणारा आॅक्सिजनच्या पुरवठा तसेच खासगी रुग्णालयांची गरज लक्षात घेता अकोला जिल्ह्यासाठी आठवड्यातून किमान चार टँकर लिक्वीड मिळणे अत्यावश्यक आहे. येणाºया काळात कोरोनाचे संक्रमण अशाच वेगाने वाढत राहिले तर चार टँकरशिवाय पर्याय राहणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एअर आॅक्सिजन निर्मितीचा हवा आणखी एक प्लांटसध्या अकोल्यात एअर आॅक्सिजन निर्मितीचा एक प्लांट औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू आहे. या प्लांटमधून अकोल्यासह व बुलडाणा व वाशिममधील शासकीय वैद्यकीय दवाखान्यांना आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो. तसेच कंत्राट या प्लांटला देण्यात आले आहे.आॅक्सिजन निर्मितीसाठी लागणाºया लिक्वीडचा तुटवडा लक्षात घेता एअर आॅक्सिजन निर्मितीचा आणखी एक प्लांट अकोल्यात कार्यान्वित झाल्यास अकोल्याच्या मागणीची तूट भरण्यास मदत होऊ शकते.जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आॅक्सिजन निर्मितीच्या एका प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर होऊन तातडीने कार्यान्वित झाल्यास भविष्यातील आॅक्सिजनची आणीबाणी संपुष्टात येऊ शकेल. तीन दिवसांची सोय झालीरविवार संध्याकाळपासूनच आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणल्याने रुग्णालये तसेच जिल्हा प्रशासनाने सूत्रे हलविल्यामुळे सध्या तीन दिवसांचा कोटा उपलब्ध झाला आहे. खासगी रुग्णालयांसाठी नागपूर, जालना आणि भुसावळ येथून काही सिलिंडर मागविण्यात आले. केवळ सिलिंडर आणण्यासाठी होतो वेळेचा अपव्ययजगण्यासाठी आॅक्सिजनच लागतो, त्यामुळे आॅक्सिजनसाठी विलंब शक्यच नाही. जालना, औरंगाबाद, भुसावळ आदी शहरांमधून आॅक्सिजनचे थेट सिलिंडरच आणले तरी अकोल्यापासून या शहरांचे अंतर, रस्त्याची स्थिती, सिलिंडर भरण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेतला तर ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आॅक्सिजन निर्मितीसाठीच अकोल्यात प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरोना संकटामुळे आॅक्सिजनची मागणी एकदम तिप्पट झाली आहे. त्यामुळे साहजिकच पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलविले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवड्याला चार टँकर मिळणे आवश्यक आहे.-डॉ. स्वप्निल ठाकरेआॅक्सिजन पुरवठादार 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय