शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात आणखी ३० रुग्ण वाढले; एकूण आकडा ४६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:45 IST

एकूण ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ४६५ झाली आहे.

ठळक मुद्देएकट्या हरीहर पेठ भागातील १३ रुग्ण. सद्या १४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.बुधवारी सकाळी १८३ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले.

अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला शहरात संसर्गाचा वेग कायम असून, बुधवार, २७ मे रोजी आणखी ३० रुण वाढले. एकट्या हरीहर पेठ भागातील १३ रुग्णांसह एकूण ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ४६५ झाली आहे. जिल्ह्यातील मृतकांची संख्याही २८ झाली असून, आतापर्यंत २८९ रुग्ण बरे झाल्यामुळे सद्या १४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी १८३ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी ३० जण पॉझिटिव्ह असून, १५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे एकट्या हरिहर पेठ भागातील रहिवासी आहेत. मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४६५मयत-२८(२७+१),डिस्चार्ज- २८९दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४८प्राप्त अहवाल-१८३पॉझिटीव्ह-३०निगेटीव्ह-१५३

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या