शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:04 IST

अकोल्यात १४ मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला जिल्ह्यात दररोज सरासरी एकाचा कोरोनामुळे बळी जात आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याच्या पृष्टर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी एक टिष्ट्वट केले. त्यानुसार अकोल्यात १४ मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याचा दावा त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली.राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाने राज्याची आरोग्य यंत्रणाच अडचणीत आली होती. दरम्यान, शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेला मृतकांचा आकडा हा लपविलेला होता, असा दावा करीत फडणवीस यांनी जिल्हानिहाय आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकड्यांचा खेळ रंगला आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची समीक्षा करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला जिल्हा स्तरावर रुग्णाच्या मृत्यूचे आॅडिट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, रुग्णांच्या मृत्यूचे तत्कालिन कारण कोविड-१९ नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे गृहीत धरण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे प्रशासनाने फेरतपासणीच्या नावाखाली लपविलेले आकडेच समोर केल्याचा आरोपही त्यांनी या टिष्ट्वटच्या माध्यमातून केला.सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये अकोला जिल्ह्यातील १४ मृत्यू लपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दाव्यामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुठलीही सुधारित माहिती नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.जिल्ह्यात आतापर्यंत ५८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या सर्व मृत्यूची नोंद योग्य पद्धतीने करण्यात आली असून, तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नव्याने दाखविण्यात येणाºया त्या १४ मृत्यूची नोंददेखील यापूर्वीच करण्यात आली असून, त्यांचा समावेश ५८ मध्येच आहे.- डॉ. रियाज फारुकी,आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस