शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर सुरुच; दोन दिवसात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 12:50 IST

गत दोन दिवसांत अकोला शहर, मुर्तीजापूर व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १५६ वर पोहचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गत दोन दिवसांत अकोला शहर, मुर्तीजापूर व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १५६ वर पोहचला आहे. दरम्यान, बुधवारी आणखी ६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ४१३२ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ३६६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत ३०४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये २० महिला व ४२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या मुर्तीजापूरातील २४ जणांसह, आलेगाव येथील सहा जण, गोरक्षण येथीले चार, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, पातूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, शिवचरण पेठ, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण, रणपिसे नगर, गणेश नगर, कान्हेरी गवळी, ज्योती नगर, बाळापूर, बोरगांव मंजू, जुने शहर, कौलखेड, वाडेगाव, जठारपेठ, मोठी उमरी, कुरणखेड व इंदिरा नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.चौघांचा मृत्यूबुधवारी रामदास पेठ, अकोला येथील ७६ वर्षीय पुरुष व मुर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे २६ व २८ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी हातरुण येथील ५० वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर येथील ८० वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यू झाला होता.७२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,१३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,२५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला