शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा विळखा घट्ट; आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:18 IST

शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे.

ठळक मुद्दे सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५६५ झाली आहे. आतापर्यंत ३८८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असून, दिवसेंदिवसे रुग्णांची संख्या वाढतच आहे. शनिवार, ३० मे रोजी आणखी सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५६५ झाली आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे. आतापर्यंत ३८८ रुग्ण बरे झाल्याने आता १४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्यात गेले आहेत. शुक्रवार, २९ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५८ होता. यामध्ये शनिवारी सात नव्या रुग्णांची भर पडत हा आकडा वर ५६५ गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी ४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, डाबकी रोड भागातील साई नगरातील एका व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २४ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.जिल्ह्यात आतापर्यंत ३० कोरोनाब् ााधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी २९ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ३८८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४७ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-४९पॉझिटीव्ह-सातनिगेटीव्ह-४२आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ५६५मयत-३०(२९+१),डिस्चार्ज- ३८८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला