शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:39 IST

सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या भागात साफसफाईची कामे करणाºया सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने संबंधितांच्या आरोग्य तपासणीला खो दिल्याचे समोर आले आहे.कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील उत्तर झोनमध्ये ७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. आजरोजी कोरोनाबाधित रुग्णांनी १,४२१ चा आकडा गाठला असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जात आहेत. कंटेनमेन्ट झोनमधील नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी महापालिकेचे शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. याव्यतिरिक्त शहरातील प्रतिबंधित भागात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाचे सफाई कर्मचारी जात आहेत. मागील तीन महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर आरोग्य तपासणी जात असल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच शहराच्या विविध भागातील सर्व्हिस लाइन तसेच नाल्यांची सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे केली जात आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता व नागरिकांकडून सोशल डिस्टनन्सिंगचे होणारे उल्लंघन लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शिक्षक, आशा वर्कर, सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पहिल्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रात साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टरवरील चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागाला दिले होते.

पूर्व झोनमधील तपासणी आटोपलीमनपा प्रशासनाने पूर्व झोनमधील कार्यरत सफाई कर्मचाºयांसोबतच इतर कर्मचाºयांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित झोनमधील कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करणे अपेक्षित होते. पुढे ही तपासणी झालीच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित झोनमध्ये तपासणीची प्रक्रिया कधी, असा सवाल कर्मचाºयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सुरक्षा साधनांचा अभावशहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करणाºया शिक्षक-आशा वर्कर यांना सुरक्षा साधनांची पुरेशा प्रमाणात पूर्तता होत नसल्याची परिस्थिती आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका