शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आणखी एक बळी; ४९ नवे पॉझिटिव्ह, २९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:35 IST

८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११५ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, ८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११५ झाली आहे. तर दिवसभरात ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २९७२ वर गेली आहे. दरम्यान, शनिवारी २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १८४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये २१ महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रामनगर येथील पाच जणांसह बार्शीटाकळी येथील तीन जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, प्रसाद कॉलनी येथील तीन जण, दाळंबी येथील तीन जण, केशव नगर येथील दोन जण, केळकर हॉस्पिटल येथील दोन जण, बोरगाव मंजू, रतनलाल प्लॉट, न्यू भिमनगर, चिंतामणी नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, गोपालखेड, मलकापूर, जीएमसी वसतीगृह, आनंद नगर, सस्ती ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तीजापूर येथील सहा जणांसह, दाळंबी येथील तीन जण, लोहारा येथील दोन जण, वाडेगाव येथील दोन जण, पाचमोरी येथील दोन जण, सुधीर कॉलनी व गोपालखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यूखासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. हा रुग्ण गोरक्षण रोड येथील रहिवासी असून, त्यांना ७ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२९ जणांना डिस्चार्जशनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १०, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक व हॉटेल रणजित येथून सात जणांना असे एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४८३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला