शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा वेग मंदावला; २३९ निगेटिव्ह, १५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:42 IST

सोमवार, १३ जुलै रोजी प्राप्त एकूण २५४ कोरोना संसर्ग अहवालांपैकी तब्बल २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे केवळ १५ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.यामध्ये सात महिला, आठ पुरुष आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८९४ झाली आहे.

अकोला : गत तीन महिन्यांपासून अकोला शहर व जिल्ह्यात प्रचंड धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग गत काही दिवसांपासून किंचीतसा मंदावल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवार, १३ जुलै रोजी प्राप्त एकूण २५४ कोरोना संसर्ग अहवालांपैकी तब्बल २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर केवळ १५ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आलेल्या अकोल्यात मे महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर जुन महिन्यात दररोज मोठ्या संख्यने रुग्ण सापडण्याचे सत्र सुरुच राहून या महिन्यात एक हजारपेक्षाही अधिक रुग्ण वाढले. त्यामुळे नागपूरनंतर विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी कुप्रसिद्धी अकोल्याची झाली आहे. गत काही दिवसांपासून मात्र कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण किंचीत घटले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी २५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला, आठ पुरुष आहेत. त्यात तीन जण पातूर येथील, दोन जण नवीन बसस्टॅण्ड जवळ, दोन जण गोरक्षण रोड, दोन जण अकोट, दोन जण मुर्तिजापूर तर उर्वरीत गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८९४ झाली आहे.२८८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत  एकूण १८९४ (१८७३+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९४ जण (एक आत्महत्या व ९३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५१२ आहे. तर सद्यस्थितीत २८८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल-२५४पॉझिटीव्ह-१५निगेटीव्ह- २३९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८७३+२१= १८९४मयत-९४(९३+१)डिस्चार्ज- १५१२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २८८

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला