शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोरोनामुळे अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 18:15 IST

अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संजय मैद यांनी दिली.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला:अमरावती येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अधिवेशन निश्चीत झाले होते .  शासनाने कोरोना बाबत सावध पवित्रा घेत शासकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मेळावे, यात्रा , सार्वजनिक उपक्रम न घेण्याबाबत  शासकीय कार्यालयांना आदेशीत केले आहे व इतर सामाजिक उपक्रमांबाबत निर्देश जारी करून दक्षता घेण्याचे केलेले आवाहनास प्रतिसाद देत अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शारीरिक शिक्षण संघटनांच्या समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, विभागीय अध्यक्ष जयदिप सोनखासकर महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय मैद यांनी दिली.      महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, क्रीडा शिक्षक महासंघ अनगर , क्रीडा विकास परिषद व सहयोगी संघटनांचे वतीने अधिवेशन निश्चीत करण्यात आले होते. सद्य स्थितीतील कोरोना विषाणुच्या संक्रमणाची तीव्रता लक्षात घेता विषाणूचे संक्रमण होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून पुढील तारीख समन्वय समितीच्या बैठकीत निश्चीत करणार असल्याचे अधिवेशनाचे निमंत्रक शिवदत्त ढवळे व समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी सांगितले.       अधिवेशनासंदर्भात राज्य समन्वय समितीची तातडीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीस अमरावती महामंडळाचे अध्यक्ष डॉ अरुण खोडस्कर, सचिव डॉ पुरुषोत्तम उपर्वट, क्रीडा विकास परिषदेचे राज्य सचिव ज्ञानेश काळे, समन्वय समितीचे विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, शिवदत्त ढवळे, संजय पाटील, शरद वाबळे, आनंद पवार, सुनील गागरे, जालिंदर आवारी, जितेंद्र लिंबकर, अजय आळशी, डॉ नितीन चवाळ, अविनाश साळकर या सह विविध जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावती