शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चार तास ‘एक्स-रे’साठी वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:16 IST

१ वाजताच्या सुमारास हे रुग्ण तेथे पोहोचल्यावर वॉर्डात तंत्रज्ञनच उपस्थित नसल्याचे समजले.

अकोला : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. प्रयत्न करूनही व्यवस्थापन बिघडत आहे. याचाच फायदा काही कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत असल्याचं वास्तव शुक्रवारी ‘एक्स-रे’ काढण्यासाठी गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकरणातून उघडकीस आलं.सर्वोपचारमध्ये मनुष्यबळाची कमी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे; मात्र, याचाच फायदा काही कर्मचारी घेत असल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी ‘एक्स-रे’ काढण्यासाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या निदर्शनास आला. वैद्यकीय चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्णांना ‘एक्स-रे’ काढण्यासाठी पाठविण्यात आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास हे रुग्ण तेथे पोहोचल्यावर वॉर्डात तंत्रज्ञनच उपस्थित नसल्याचे समजले. तास दोन तासांचा वेळ गेल्यानंतर तेथील एका कर्मचाºयाने पॉझिटिव्ह रुग्णांनाच ‘एक्स-रे’ प्लेट आणून द्या अन् ‘एक्स-रे’ घेऊन जाण्याचा सल्ला दिला. हा प्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी तत्काळ त्या रुग्णांना ‘एक्स-रे’ दिला. या संदर्भात संबधीत अधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला....तर चार तास प्रतीक्षा का?कोरोनाबाधित रुग्णांनी एक्स-रे साठी तब्बल चार तास प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना एक्स-रे देण्यात आला. रुग्णालयात एक्स-रे प्लेट उपलब्ध असल्यामुळेच रुग्णांना एक्स-रे मिळाले. मग संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी त्या रुग्णांना चार तास तात्कळत ठेवण्याचे कारण काय? हा संशोधनाचा विषय आहे.

एक दिवसापूर्वीच जीएमसीला मिळाल्या एक्स-रे प्लेटकोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता व्हेंटीलेटरसोबतच एक्स-रे प्लेटचीदेखील मागणी करण्यात आली होती. मागणीनुसार, गुरुवारीच सर्वोपचार रुग्णालयाला एक्स-रे प्लेट उपलब्ध झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

तंत्रज्ञांची अनुपस्थिती नेहमीचीचसर्वोपचार रुग्णालयातील एक्स-रे आणि सोनोग्राफी तंत्रज्ञांची अनुपस्थिती रुग्णांसाठी नेहमीचीच डोकेदुखी आहे. एरवी खासगी लॅबही सांभाळून सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणाºया या तंत्रज्ञांची महामारीच्या काळातही अनुपस्थिती गंभीर बाब आहे.माझ्यासह पत्नी व दोन मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यास सांगितले. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील एक्स-रे वार्डात आलो होतो; परंतु या ठिकाणी तंत्रज्ञ उपस्थित नव्हते. तर उपस्थित कर्मचाºयांकडून एक्स-रे प्लेटची मागणी करण्यात आली होती. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर एक्स-रे मिळाले.- पॉझिटिव्ह रुग्ण, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या