शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:02 IST

अकोल्यातील अकोट येथे १० दिवसांचा, पातूर येथे चार तर बाळापुरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी लॉकडाऊन हा प्राथमिक पातळीवरील उपाय होता. तो आता फारसा उपयुक्त होणार नाही, असे तथ्य समोर आले आहे. अकोल्यातील अकोट येथे १० दिवसांचा, पातूर येथे चार तर बाळापुरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. त्या काळातही येथे कोरोनाचा मोठा शिरकाव झाला असून, आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे वास्तव आहे.अकोला शहराच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले आहे. बारा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये १२९ महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत, तर उर्वरित २०२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.अकोट तालुक्यातील ३ ते ९ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू होता. ३ जुलै रोजी तालुक्यातील या तालुक्यात २२ पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती जनता कर्फ्यूदरम्यान रुग्णांची संख्या वाढली. नऊ जुलै रोजी तालुक्यातील ६५ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली होती. सद्यस्थितीत अकोट हे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला असून, १३ जुलै रोजी या तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ९४ झाली आहे. बोरगाव मंजू येथे ३० जून ते ०२ जूलै दरम्यान जनता कर्फ्यु होता या कफ्यूर्ला समिश्र प्रतिसाद मिळाला होता येथेही रूग्णसंख्या वाढली असून आता पंधरा पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. बाळापुरातही लॉकडाऊनच्या काळात दहा रूग्ण वाढल्याचे समोर आले आहे.ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालय आणि कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य कें द्रांना आरोग्य दृष्टीने अधिक बळकट करणे गरजेचे आहे.

अनलॉकमध्ये अर्थकारण वाढले अन् रुग्णही!एक दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतर २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चाक रूतले. अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता सर्व उद्योग व्यापार ठप्प झाला. कोरोना आता संपणार नाही, हे लक्षात आल्यावर पुरेशी काळजी घेऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोट्यवधीचे अर्थकारण हळूहळू सावरत वाढत आहे, सोबतच लोकांची गर्दीही वाढू लागल्याने संसर्गाचे प्रमाण वाढून कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या